

Beed Ambajogai will get uninterrupted power supply
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवाः शहराच्या वीज पुरवठ्यातील पायाभूत सुविधा बळकटीसाठी मोठा टप्पा पार पडला आहे. जिल्हा नियोजन समिती (DPC) वार्षिक कार्यक्रम २०२५ अंतर्गत आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश मिळत १ कोटी २० लाखांचा निधी अंबाजोगाई शहरासाठी महावितरणच्या विविध विकासकामांसाठी मंजूअंबाजोगाईर झाला आहे. त्यामुळे शहरातील भारनियमन, कमी व्होल्टेज, तांत्रिक अडचणी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
मंजूर कामांमध्ये शहरातील प्रमुख भागांमध्ये नवे रोहित्र बसविणे तसेच विद्यमान रोहित्रांची क्षमता वाढविणे याचा समावेश आहे. सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गवळीपुरा, मुंदडा डीपी, फॉलोवर्स कॉलनी, बेजगेमवार डीपी, गॅस गोडाऊन, एसबीआय बँक परिसर, थोरात डीपी, महाराष्ट्र बँक, मिल्लत नगर, ओल्ड मोदी डीपी, तथागत चौक, योगेश्वरी नगरी, सिद्धार्थ नगर, बालाघाट नगर आणि मुकादम डीपी (पोखरी रोड) या ठिकाणी विविध क्षमतेचे नवे ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि जुन्यांची क्षमता वाढविणे यात येते.
हा निधी उपलब्ध करून देवेंद्र दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत.
या कामांमुळे वीज वितरण व्यवस्था मजबूत होऊन नागरिकांना अधिक स्थिर, दर्जेदार आणि सातत्यपूर्ण पुरवठा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढत्या गरजेनुसार हा निधी विकास प्रक्रियेस गती देणार असून औद्योगिक, व्यापारी व निवासी विभागांना याचा थेट लाभहोणार आहे.