Kalvati lake missing retired official
Kalvati lake missing retired officialPudhari

Ambajogai News | काळवटी साठवण तलावात बुडालेल्या पं.स. निवृत्त कर्मचाऱ्याचा तिसऱ्या दिवशीही शोध लागेना

अंबाजोगाई, परळी, बीड आणि मालवण येथील शोध व बचाव पथकास अपयश
Published on

Kalvati lake missing retired official

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील काळवटी साठवण तलावात गुरुवारी (दि. १८) सकाळी पोहण्यासाठी गेलेले अंबाजोगाई पंचायत समिती येथील सेवा निवृत्त कर्मचारी विश्वनाथ बुरांडे यांचा शोध लागलेला नाही. पाण्यात पोहण्यासाठी गेलेले बुरांडे बराच काळ बाहेर न आल्याचे तेथील नागरिकास निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ त्यांच्या कुटुंबियांस तसेच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना माहिती दिली.

त्यानंतर तात्काळ अंबाजोगाई येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परळी येथील शोध व बचाव पथकास देखील पाचारण केले. गुरुवार , शुक्रवार येथील पथकाने बचाव व शोध मोहीम राबवली त्यामध्ये त्यांना यश आले नाही.

Kalvati lake missing retired official
Ambajogai Ganja Seized | 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत मोठी कारवाई : घाटनांदूर येथे १२ किलो गांजा जप्त, एकाला अटक

त्यामुळे मालवण येथील शोध व बचाव पथक येऊन ते देखील शनिवार (दि. २०) दिवसभर बुरांडे यांचा शोध घेत होते. मात्र, संध्याकाळ पर्यंत त्यांना देखील बुरांडे यांचा शोध लागला नाही . त्यामुळे विश्वनाथ बुरांडे यांच्या कुटुंबियात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तर्क वितर्क लावत असल्याने तीन दिवसांपूर्वी पोहण्यासाठी गेलेले विश्वनाथ बुरांडे यांच्या विषयाची चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news