Ambajogai Police | अंबाजोगाई पोलिसांची कामगिरी; चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत

घरफोडीतील ४०.८ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी आणि लॅबमधील ३३ हजारांची रोकड फिर्यादींच्या स्वाधीन
Ambajogai Police Stolen Property Recovered
Ambajogai Police Stolen Property Recoveredpudhari
Published on: 
Updated on: 

Ambajogai Police Stolen Property Recovered

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात घडलेल्या घरफोडी आणि चोरीच्या दोन स्वतंत्र घटनांमधील हस्तगत केलेला मुद्देमाल अंबाजोगाई शहर पोलिसांनी मूळ मालकांना परत केला आहे. यामध्ये ४०.८ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी आणि ३३ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. बुधवार, दि. १८ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या हस्ते आणि पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या उपस्थितीत हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन करण्यात आला.

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. यातील पहिली घटना बँक कॉलनी परिसरात घडली होती. गुलाबचंद हनुमानदास सारडा (वय ५६) यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करून सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चोरीला गेलेला ४०.८ तोळे सोने आणि १६०० ग्रॅम चांदीचा मुद्देमाल हस्तगत केला. हा सर्व मुद्देमाल सारडा यांना परत करण्यात आला.

Ambajogai Police Stolen Property Recovered
Beed Crime News : डोक्यात दगड घालून पत्नीला संपविले

दुसरी घटना निवृत्ती पार्क, राजीव नगर येथील प्रमोद भारत चिवडे (वय ३०) यांच्या लॅबमध्ये घडली होती. या चोरीच्या गुन्ह्यातील ३३ हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली होती. ही रक्कमही संबंधित फिर्यादी चिवडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

चोरीला गेलेला मौल्यवान मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने दोन्ही फिर्यादींनी समाधान व्यक्त करत अंबाजोगाई शहर पोलिसांचे आभार मानले. नागरिकांचा हरवलेला विश्वास संपादन करण्यासह पोलिसांच्या तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ambajogai Police Stolen Property Recovered
Beed Crime News : आष्टी तालुक्यात व्यापाऱ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक सुचिता केदार, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस हवालदार पांडुरंग काळे आणि पोलीस अंमलदार हनुमंत चादर यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.