Ambajogai Crime | अंबाजोगाई येथे खळबळ : तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; ब्लॅकमेल करत लाखोंच्या दागिन्यासह रोकड उकळली

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, दोन संशयितांना अटक
Crime Case
Crime Case Pudhari
Published on
Updated on

Blackmailing, Drugged and Assaulted Case Beed

अंबाजोगाई : अंबाजोगाई येथे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा तसेच त्याचे फोटो व व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करत लाखो रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने उकळल्याचा गंभीर आरोप दोन तरुणांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे अंबाजोगाईतील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असल्याने त्यांची ओळख झाली होती. आरोपी महेश करपे (रा. धारूर) आणि पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) हे तिचा पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Crime Case
Ambajogai Theft | अंबाजोगाई बसस्थानकावर महिलेच्या बॅगेतील कप्पा कापून साडेचार लाखांचे दागिने लंपास

फिर्यादीनुसार, महेश करपे याने एका वेळी तरुणीला खाण्याच्या पदार्थातून गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच दुसरा आरोपी पवन कराड यानेही गुंगीचे औषध देऊन तिला अन्य ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी कथित प्रकाराचे फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे पीडितेकडून वेळोवेळी सुमारे तीन लाख रुपये रोख रक्कम आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Crime Case
Ambajogai News : ४१°C तापमानात तहानलेले अंबाजोगाई; पाणपोई कुठे गायब?

सततच्या मानसिक छळाला कंटाळून पीडित तरुणीने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधवर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news