बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

Krishi Pradarshan Beed 2026 | मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे
Sunetra Pawar
Sunetra PawarPudhari
Published on
Updated on

आष्टी : नवे तंत्रज्ञान, नवे विचार आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल या ध्येयवाक्याने प्रेरित होऊन मा. आ. भीमरावजी धोंडे साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेले मराठवाड्यातील सर्वात मोठे डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन (वर्ष – ३ रे) याचा भव्य उद्घाटन समारंभ दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आष्टी येथे पार पडणार आहे. शेतकरी, कृषी तज्ञ, विद्यार्थी व नागरिकांसाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, पीकपद्धतीतील बदल, सेंद्रिय शेती, पशुसंवर्धन व कृषी प्रक्रिया उद्योग याबाबत सविस्तर मार्गदर्शन या प्रदर्शनात दिले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. दत्तात्रय  भरणे (कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल, महाराष्ट्र राज्य), मा. आ. धनंजय  पंडितराव मुंडे (माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. आ. प्रकाश  सोळंके (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. आ. अमरसिंह  पंडित (माजी विधानपरिषद सदस्य, गेवराई), मा. आ. बाळासाहेब  आजबे (माजी विधानसभा सदस्य, आष्टी), मा. श्री. सुरज चव्हाण (प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मा. श्री. राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड), मा. श्री. तुषार पवार (उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृषी परिषद, पुणे), मा .श्री सुरज मांढरे (कृषी आयुक्त महाराष्ट्र) प्रा. डॉ. इंद्र मणी (कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) ,मा. श्री. विवेक जॉन्सन (जिल्हाधिकारी, बीड ), पप्पूजी कागदे (युवक रिपाई प्रदेशाध्यक्ष)आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुनील वानखेडे (विभागीय कृषी सहसंचालक, छ. संभाजीनगर), मा. श्री. सुभाष साळवे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड), मा. श्री. उद्धव गर्जे (उपविभागीय कृषी अधिकारी, बीड), श्री. सुरज पाटील (जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, बीड), मा. श्रीमती वैशाली पाटील (तहसीलदार, आष्टी), मा. श्री. गोरख तरटे (तालुका कृषी अधिकारी, आष्टी), मा. श्री. अमृत गांगर्डे (तालुका कृषी अधिकारी, शिरूर कासार), मा. श्री. शिवकुमार स्वामी (उपजिल्हाधिकारी, बीड – निवासी), मा. श्री. दादाराव जाधवर (कृषी उपसंचालक, बीड), मा. श्री. साहिल सय्यद (कृषी विकास अधिकारी, बीड), मा. श्री. वल्लभ भोसले (जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, बीड), मा. श्री. गोकुळ बागलाने (गटविकास अधिकारी, पंचायत समिती आष्टी), मा. श्री. ओंकार शेळके (तालुका कृषी अधिकारी, पाटोदा), ) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्वागताध्यक्ष म्हणून मा. आ. भीमराव धोंडे (संस्थापक अध्यक्ष, आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी) हे मान्यवरांचे स्वागत करणार आहेत. निमंत्रक म्हणून डॉ. अजयदादा धोंडे (सहसचिव, आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी) व श्री. अभयराजे धोंडे (कोषाध्यक्ष, आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी) कार्यरत आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संचलित श्री. छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोर, नगर-जामखेड रोड, आष्टी, ता. आष्टी, जि. बीड येथे हे भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी अवजारे, ड्रोन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती, जलसंधारण तंत्र, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग यांचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध शासकीय विभाग, कृषी कंपन्या, स्वयंसेवी संस्था व प्रगत शेतकरी यांचे स्टॉल शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरणार आहेत. एकूणच, मराठवाड्यातील सर्वात मोठे समजले जाणारे हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान व नव्या संधींचे प्रभावी व्यासपीठ ठरणार असून आष्टी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news