बीड : विवाहितेचा पाठलाग करून भर रस्त्यात विनयभंग

पतीसह भावाला जीवे मारण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल
married girl molested
विवाहितेचा भर रस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखलPudhari File Photo

केज (बीड) : आईसोबत रस्त्याने जाणाऱ्या एका विवाहित तरुणीचा पाठलाग करून तिचा भर रस्त्यात विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना केज शहरात गुरूवारी (दि.२५) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

married girl molested
सोलापूर : हुंड्यासाठी विवाहितेचा गर्भपात; मुलासह ठार मारण्याची धमकी

याबाबतची माहिती अशी की, एक विवाहित तरुणी आपल्या आईसोबत केज शहरातील बँकेत खाते उघडून बस स्टँडच्या रस्त्याने जात होती. यादरम्यान शहरातील अमर कदम (रा. कदमवाडी ता. केज) याने त्यांचा मोटारसायकल वरून पाठलाग केला. त्यानंतर त्या तरूणीचा हात ओढून तिचा विनयभंग केला. व तिला शिवीगाळ करत पतीसह भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर तरुणीच्या आईने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कदम याने मोटरसायकलवरून चालवत त्याने तेथून पळ काढला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादी वरून अमर कदम याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटी आणि आयटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news