Beed Crime : कलाकेंद्रात कामाचे प्रलोभन, बारामतीतील तरुणीवर अंबाजोगाईत सामूहिक अत्याचार

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने बारामती पोलीसात गुन्हा दाखल, आरोपी महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल
Rape
Pudhari
Published on
Updated on

अंबाजोगाई / बारामती : बारामती येथील तरुणीला अंबाजोगाई येथील कला केंद्रात नृत्य कलेचे काम देण्याचे प्रलोभन देऊन नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अंबाजोगाई येथील एका महिलेसह चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून, कलाकेंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक कृत्यावर चाप बसवण्यात येण्याची मागणी करत घडलेल्या घटनेवर नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पिढीत तरुणी व तिच्या आईने या घटनेबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीसात धाव घेतली असताना तेथील पोलिसांनी पीडितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याने त्या पीडितेने बारामती येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Rape
Beed News : गादीवरून वाद पेटला! सासुरा मठात दोन महाराजांची तुंबळ हाणामारी? एकमेकांविरुद्ध थेट पोलिसांत तक्रारी

फिर्यादीत म्हटले की, कन्हेरी (ता. बारामती) येथील महिलेची मुलगी नृत्य आणि गायनाची आवड जोपासत होती. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने फिर्यादीशी संपर्क साधला. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली, मात्र मुलीला अंबाजोगाई येथील 'पायल कलाकेंद्र' येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील 'साई लॉज'वर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले आणि वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाला.’

Rape
Gevarai Crime | गेवराई नगरपरिषद निवडणूक दोन गटांत वाद : बाळराजे पवार यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

अत्याचारानंतर पीडितेने कसाबसा आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथकातील एपीआय जाधवर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news