Beed Crime : डिझेल चोरट्यांची टोळी जेरबंद; बीएमडब्ल्यूसह चार वाहने ताब्यात

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; ४०० ते ४५० लिटर डिझेल, ११ ड्रम आणि चोरीचे साहित्य जप्त
Ashti Diesel Theft Case
Ashti Diesel Theft Casepudhari photo
Published on: 
Updated on: 

आष्टी : डिझेल चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध आष्टी पोलिसांनी मोठी कारवाई करत ४०० ते ४५० लिटर डिझेलसह चोरीसाठी वापरण्यात आलेली वाहने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत विनानंबरची स्विफ्ट कार, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार, पाइप आणि ११ ड्रम जप्त करण्यात आले. तपासादरम्यान बीएमडब्ल्यूसह आणखी तीन चारचाकी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या टोळीच्या कारवायांची व्याप्ती समोर येण्याची शक्यता आहे.

शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई सुरू केली.

Ashti Diesel Theft Case
Jalna News : जिल्ह्यात दिवाळीवर दुष्काळाचे सावट

कारची झडती घेतली असता, ११ ड्रममध्ये अंदाजे ४०० ते ४५० लिटर डिझेल आढळले. डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारी मोटार आणि पाइपही पोलिसांनी जप्त केले. त्यानंतरच्या तपासात डिझेल चोरीच्या विविध गुन्ह्यांत वापरल्याचा संशय असलेली आणखी तीन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यामध्ये बीएमडब्ल्यू कारचाही समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीत मातकुळी गावातील २० ते ३० वयोगटातील काही तरुणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध अहिल्यानगरसह इतर जिल्ह्यांत डिझेल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, टोळीतील अन्य सदस्य, चोरीच्या घटनांची व्याप्ती आणि वाहनांचा वापर याबाबत तपास सुरू आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, पोलीस अंमलदार नागेश लोमटे, अमोल नवले, भारत गुजर, नवनाथ पाखरे, नितीन काकडे, विलास गुंडाळे, अक्षय लोंढे, सचिन शिरसागर आणि दादा येळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या कारवाईमुळे आष्टी सह अन्य भागांतील डिझेल चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Ashti Diesel Theft Case
Sambhajinagar Crime : पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीला विवस्त्र करून दिले सिगारेटचे चटके

चिंचपूर परिसरात पाठलाग करून पकडले

सकाळी सातच्या सुमारास जामखेड–आष्टी मार्गावरील चिंचपूर गावाजवळ काळ्या काचा असलेल्या विनानंबरच्या स्विफ्ट कारवर पोलिसांना संशय आला. पोलीस अंमलदार नागेश लोमटे यांनी पाठलाग करून कार थांबवली. यावेळी कारमधील गोविंद पोपट शिरसाट (रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news