Jalna News : जिल्ह्यात दिवाळीवर दुष्काळाचे सावट

दुकाने सजली, मात्र ग्राहकीचा अभाव; खरीप गेल्याने अर्थकारण मंदावले
Drought Impact on Diwali
Drought Impact on Diwalipudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे खरीप हंगामाला मोठा फटका बसला असून, त्याचे परिणाम आता दिवाळीच्या सणावरही दिसून येत आहेत. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. व्यापाऱ्यांनी विविध वस्तूंची दुकाने आकर्षक पद्धतीने सजविली असली, तरी ग्राहकांची अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावली असून, दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

जालना शहर हे जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. शहरातील कापड बाजारासह बांधकाम साहित्य आणि विविध जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल येथे होते. दरवर्षी दिवाळीच्या काळात नवीन कपडे, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, विद्युत रोषणाई आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळते. त्यामुळे व्यापाऱ्यांना या सणाच्या काळात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा असते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठेतील उत्साह कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Drought Impact on Diwali
Jalna Crime : मारहाण प्रकरणात आरोपींना कारावासासह दंडाची शिक्षा

जालना जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, दैनंदिन गरजा भागवितानाही त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, सणासुदीच्या काळात होणाऱ्या खरेदीला मर्यादा येत आहेत. गरजेच्या वस्तूंनाच प्राधान्य देत अनेक ग्राहक खरेदीचे नियोजन करत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आगामी काळात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा राहू शकतो. अशा परिस्थितीत सणासाठी मोठा खर्च करण्याऐवजी उपलब्ध पैशांची बचत करण्याकडे नागरिकांचा कल राहण्याची शक्यता आहे.

Drought Impact on Diwali
Sambhajinagar Crime : पाचवीत शिकणाऱ्या चिमुकलीला विवस्त्र करून दिले सिगारेटचे चटके

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी दुकानांमध्ये विविध वस्तूंची मांडणी करून ग्राहकांची प्रतीक्षा सुरू केली आहे. मात्र, बाजारपेठेत अपेक्षित खरेदी होत नसल्याने व्यापाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत.दिवाळीच्या सणात झालेल्या खरेदीवरच व्यापाऱ्यांचे आर्थीक गणित अवलंबुन आहे.त्यामुळे दिवाळीकडे व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.

चिंता वाढली

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा परिणाम यंदाच्या दिवाळीच्या उत्साहावर झाला असून, बाजारपेठेला पुन्हा तेजी कधी येणार, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.बाजारावर मंदीचे सावट असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news