Mumbai Data Centre Projects: मुंबई बनली देशाची डेटा सेंटर्सची राजधानी

नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार सात प्रमुख शहरांतील ८० नियोजित डेटा सेंटर प्रकल्पांपैकी ३४ मुंबईत उभारले जात आहेत. १०० मेगावॅटवरील १५ प्रकल्पांचाही समावेश आहे.
Mumbai Data Centre Projects
Mumbai Data Centre ProjectsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: देशातील सात प्रमुख शहरांमधील डेटा सेंटर प्रकल्पांच्या एकूण विकास आराखड्यात मुंबईचा वाटा सर्वाधिक ४३ टक्के असल्याची माहिती रिअल इस्टेट सल्लागार संस्था नाईट फ्रँक इंडियाने दिली.

मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, कोलकातासह सात प्रमुख बाजारपेठांमध्ये ८० डेटा सेंटर उभारण्यात येत आहेत. सप्टेंबरअखेरीसच्या तिमाहीत नियोजित ८० प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्प (एकूण ४२.५ टक्के) मुंबईत उभारण्यात येत आहेत.

Mumbai Data Centre Projects
Sharad Pawar Delimitation Bill MVA Rift: परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडीत मतभेद; शरद पवार गटावर काँग्रेस-ठाकरे गटाची टीका

यातील १८ प्रकल्प ५० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे आहेत. तसेच, १०० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या प्रकल्पांच्या बाबतीतही मुंबई आघाडीवर असून, २०२५ मध्ये अशा प्रकल्पांची संख्या १० होती. त्यात २०२६ च्या सप्टेंबरच्या तिमाहीत १५ पर्यंत वाढ झाली आहे.

Mumbai Data Centre Projects
Maharashtra Lok Sabha Seats Delimitation: ...तर महाराष्ट्रात ४३२ आमदार; ३३ टक्के महिलांना मिळणार संधी

याव्यतिरिक्त, मुंबईत १० ते ५० मेगावॅट क्षमतेचे १६ प्रकल्प आहेत. हैदराबाद हे नियोजित प्रकल्पांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे मोठे केंद्र ठरले आहे. येथे प्रकल्पांची एकूण संख्या २०२५ मधील ११ वरून सप्टेंबर तिमाहीत १५ वर पोहोचली आहे. हैदराबादमध्ये १०० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेचे प्रकल्प असून, त्यांची संख्या चारवरून आठवर गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.