

कडा : शेतकऱ्यांच्या कृषी वीजपुरवठ्याचा कायमचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सौर कृषी वीज वाहिनी 2.0 या योजनेअंतर्गत आष्टी,पाटोदा व शिरूर तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.या तीनही तालुक्यांतील 11 वीज उपकेंद्रांमध्ये अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले असून,त्यामुळे कृषी वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे.
ही महत्त्वपूर्ण मंजुरी आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाली आहे. वाढता विद्युत भार,वारंवार होणारे फॉल्ट,कमी व्होल्टेज व अपुऱ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आमदार धस यांनी वेळोवेळी शासन व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्या होत्या.अखेर त्यांच्या ठाम भूमिकेला यश आले आहे.
या निर्णयानुसार10 एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिरिक्त पावर ट्रान्सफॉर्मर33/11 के.व्ही. उपकेंद्र,आष्टी व 33/11 के.व्ही.उपकेंद्र, धानोरा 5 एम.व्ही.ए.क्षमतेचे अतिरिक्त पावरट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले असून याचा सावरगाव, जळगाव (कडा साखर कारखाना),डोईठाण, कुसळंब, लांबरवाडी, कोतन,दासखेड,घाटशीळ पारगाव,भायाळ(सर्व 33/11 के.व्ही.उपकेंद्रे) असणार आहेत.
या नव्या ट्रान्सफॉर्मरमुळे कृषी पंपांना स्थिर व अखंड वीजपुरवठा होऊन कमी व्होल्टेजची समस्या दूर होणार आहे तसेचभार नियंत्रण सुलभ वदिवसा दर्जेदार वीज उपलब्ध होणार असल्याने याचा थेट परिणाम शेती उत्पादन वाढीवर होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सकारात्मक वाढ होणार आहे.
शेतकऱ्यांत समाधान
शेतकरी, कृषी व ग्रामीण विकासाला नेहमीच अग्रक्रम देणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच ही कामे मंजूर झाल्याची भावना शेतकरी व नागरिकांतून व्यक्त होत आहे. या निर्णयाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.