कुंडलिक खांडेला अटक; शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरुनही हटवले

माऊली खांडे मारहाण प्रकरणात तीन दिवसांची कोठडी
Three days custody in Mauli Khande beating case
कुंडलिक खांडेला न्यायलयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : जामखेड येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी(दि.29) पहाटे ताब्यात घेतले आहे. यानंतर खांडेना बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाीने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या क्‍लिपनंतर शिवसेनेनेही खांडे यांच्यावर कारवाई करत त्यांना पदावरुन हटवले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी एप्रिल महिन्यात शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख माऊली खांडे यांना मारहाण केल्याच्या आरोपावरुन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी खांडे यांच्या संभाषणाची कथीत क्‍लिप व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांना आपण लोकसभा निवडणूकीत धोका दिल्याचे म्हटले होते. तसेच विरोधी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना बीड मतदारसंघात मदत केली असल्याचे म्हटले होते. याबरोबरच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचे संभाषण होते. या प्रकरणातही पेठबीड आणि परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात पक्षानेही खांडे यांच्यावर कारवाई करत त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले आहे.

Three days custody in Mauli Khande beating case
व्हायरल ऑडिओ क्‍लिप : शिवसेना जिल्‍हाप्रमुख कुंडलिक खांडे, शिवराज बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

चार महिन्यांपूर्वीच दिला राजीनामाः खांडे

दरम्यान, शिवसेना शिंदे गटातून हकालपट्टीचा निर्णय समोर आल्यानंतर कुंडलिक खांडे यांनीही एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने शिवसेनेचे मी प्रामाणिकपणे काम केले. जनतेचे प्रश्न सोडवले तसेच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या अनिल जगताप यांना बीड विधानसभा क्षेत्राचा कार्यभार दिल्याने मी नाराज होतो. वास्तविक बीड विधानसभा क्षेत्रात मी शिवसेना पक्षाची बांधणी मोठ्या प्रमाणात केली होती. विधानसभा निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना मला बीड विधानसभा क्षेत्रापासून दुर करण्याचा प्रयत्न झाल्याने मी व्यथित झालो होतो. दि. 28 जानेवारी 2024 रोजी मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खा.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला होता. परंतु अद्यापपर्यंत तो त्यांनी स्विकारला नाही. त्यामुळे माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली असे म्हणणे साफ चुकीचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news