Solar power project : आनेगाव शिवारात 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार; शेतीसाठी मोठा दिलासा
Solar power project
आनेगाव शिवारात 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभpudhari photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील आनेगाव शिवारात केज सोलार प्रायव्हेट लिमिटेडच्या 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून शेतीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी खा. रजनी पाटील यांनी सौर ऊर्जा ही काळाची गरज असल्याचे सांगत अशा प्रकल्पांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की “सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. दिवसा वीज उपलब्ध झाल्यास शेतीची कामे वेळेत पूर्ण होऊन उत्पादनात वाढ होईल.

Solar power project
Swabhimani Protest : आंबा-काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा

शाश्वत विकासासाठी अशा प्रकल्पांची उभारणी अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास माजी मंत्री अशोकराव पाटील, माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, गंगा माऊली साखर कारखान्याचे चेअरमन हनुमंत मोरे, सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, महावितरणचे सहायक अभियंता हलकुडे, प्रवीण मोरे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जितेंद्र बजाज, अमित पाटील, तेजस्विनी पाटील, देविका पाटील, रेवती सोनवणे आदी उपस्थित होते.

Solar power project
Hingoli farmer protest : प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक

दरम्यान, गावकऱ्यांच्या वतीने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल रजनी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा प्रकल्प उभारण्यासाठी केज सोलार प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news