

आष्टी पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याअंतर्गत दि. 04/01/2026 रोजी मध्यरात्री 01.00 ते 01.30 वाजेच्या सुमारास मौजे सराटेवडगाव येथे ग्यानबा काशिनाथ राजपुरे यांच्या घरी अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केल्याची घटना घडली. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती व विविध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करण्यात आली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कावत सर, मा. पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बाळकृष्ण हनपुढे पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. मंगेश साळवे सर, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, अतुल दाताळ, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाट, कृष्णा नरवडे, कृष्णा लव्हारे, जयराम उभे,
महिला पोलीस सुनिता खरमाटे, चालक राजाराम कांबळे तसेच पोलीस मित्र महेश जाधव यांनी गुन्हा दाखल होताच तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार व विविध सीसीटीव्हीच्या आधारे तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
गुन्ह्यातील काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून उर्वरित फरार आरोपींनाही अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. चंद्रकांत तावरे हे करीत आहेत.