Ambajogai RTO office expansion : परिवहन कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 15 कोटी

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
Ambajogai RTO office expansion
आ. नमिता मुंदडाpudhari photo
Published on
Updated on

अंबाजोगाई: येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारत बांधकामाच्या 14 कोटी 99 लाख 75 हजार 406 रुपयांच्या निधीस प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. यामुळे या कार्यालयाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशेष म्हणजे या इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम आधीच पूर्ण झाले असून त्या ठिकाणी सध्या नियमित कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या भक्कम पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.

Ambajogai RTO office expansion
Nashik Kumbh Mela | सिंहस्थासाठी १२,१८१ कोटींच्या कामांना मान्यता

महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री स्व. विमलताई मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक अंबाजोगाईत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून आणले होते. यामुळे अंबाजोगाईसह सहा तालुक्यातील वाहनधारकांची मोठी सोय झाली होती. सुरुवातीपासून हे कार्यालय भाड्याचे जागेत सुरु होते. त्यानंतर स्व. विमलताईंच्या सुनबाई नमिता मुंदडा यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून या कार्यालयाला भव्य आणि सुसज्ज वास्तू मिळवून दिली आहे.

नुकतेच हे कार्यालय स्वतःच्या नूतन वास्तूत स्थलांतरित झाले आहे. दरम्यानच्या काळात आमदार नमिता मुंदडा यांनी भविष्याच्या दृष्टीने कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांनाही आत यश आले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

या नवीन मंजुरीनुसार इमारतीचा स्टिल्ट फ्लोअर आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम केले जाणार असून यामध्ये फर्निचर, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युतीकरण आणि सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासारख्या कामांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीला संरक्षक भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते, वाहनतळ शेड आणि मुख्य प्रवेशद्वारासाठी पुलाचे बांधकाम देखील करण्यात येणार आहे.

Ambajogai RTO office expansion
Gulf Stranded Passengers: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर ४०५ प्रवासी मुंबईत सुखरूप; विशेष विमानांतून मराठीजनांची सुटका

दिव्यांगांसाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व सोलर रूफटॉप यंत्रणा उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news