Ambajogai News : शिस्त पाळा, अन्यथा कारवाई करणार

अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक जोगदंड यांचा रिक्षाचालकांना इशारा; ठाण्यात घेतली बैठक
Ambajogai News
Ambajogai News : शिस्त पाळा, अन्यथा कारवाई करणारfile photo
Published on
Updated on

Ambajogai Police Inspector Jogdand warns auto-rickshaw drivers; a meeting was held at the police station

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी दिला आहे.

Ambajogai News
jalna news : नळविहिरा परिसरात माकडांचा उच्छाद

अंबाजोगाई पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून शरद जोगदंड यांनी अंबाजोगाई शहराची बिघडलेली शिस्त पुन्हा लावण्यासाठी प्रयत्न करतात दिसून येत आहेत. अंबाजोगाई पोलिस ठाण्यात रिक्षाचालकांची बैठक घेत त्यांनी सूचना केल्या. पोलिस निरीक्षक जोगदंड यांनी अंबाज ोगाई शहरात लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणाबाबत व्यापाऱ्यांशी संवाद साधत ती अतिक्रमणे निष्कासित करण्यात यश मिळवले.

त्यानंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था बऱ्याच अंशी पूर्वपदावर आणण्यासाठी यशस्वी झाले. काही दिवसांपूर्वी अंबाजोगाई शहरात वाढलेल्या दुचाकी स्वरांना नियमांची आठवण करून दिली. १८ वर्षाखालील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी दुचाकी चालवण्यासाठी देऊ नये याबाबतीत पालकांमध्ये जनजागृती केली. हेल्मेट सक्ती व त्याचे महत्त्व देखील दुचाकीस्वारांना पटवून दिले.

Ambajogai News
10th Exam : ३७३३८ बारावी तर ३२४३३ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

मोटार सायकलचे कर्कश हॉर्न व सायलेंसर काढून त्यावर बुलडोझर फिरवला. याउपर देखील कायदा व नियम न पाळल्यास अशा दुचाकी स्वारांवर दंडात्मक कार्यवाही देखील करण्यात पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी मागे पुढे पाहिले नाही.

नुकतीच अंबाज ोगाई शहरातील ऑटोरिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांना नियम पाळण्यासाठी प्रेरित केले. ऑटोरिक्षा चालकांनी रिक्षा चालवताना शासनाने नेमून दिलेला गणवेश परिधान करण्याबाबत सूचना केल्या. ऑटोरिक्षामध्ये मोठ्या आवाजात गाणे न वाजवण्याबाबत तंबी दिली. आपापल्या गाड्याची कागदपत्रे व्यवस्थित पणे बाळगावी. तसेच रिक्षात शालेय विद्यार्थी असल्यावर विशेष काळजी घ्यावी.

आपल्यामुळे वाहतुकीस कुठेही व कसलाही अडथळा होऊ नये याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला अंबाजोगाई शहरातील अनेक ऑटोरिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासर्व बाबींवरून पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांची काम करण्याची तळमळ दिसून येत आहे. त्यांना शहरवासी देखील चांगल्या प्रमाणात सहकार्य करताना आढळून येते आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news