Ambajogai News|अंबाजोगाईत निवडणुकीचे पडघम: नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

शहरात १५ प्रभाग, ३१ नगरसेवक : प्रभाग निहाय प्रारूप भौगोलिक सीमा स्‍पष्‍ट
Ambajogai News
अंबाजोगाईत निवडणुकीचे पडघमPudhari Photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयाने सोमवारी (दि. १८) शहराच्या प्रारूप प्रभाग रचनेच्या भौगोलिक सीमा जाहीर केल्या आहेत. यानुसार, शहराची १५ प्रभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, नगर परिषदेचे एकूण सदस्य संख्याबळ ३१ असणार आहे.

या नवीन रचनेनुसार, एकूण १५ प्रभागांपैकी १४ प्रभाग हे द्विसदस्यीय (प्रत्येकी २ नगरसेवक) असतील, तर एक प्रभाग त्रिसदस्यीय (३ नगरसेवक) असणार आहे. त्यामुळे १४ प्रभागांतून २८ आणि एका प्रभागातून ३ असे एकूण ३१ सदस्य निवडले जातील, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली.

Ambajogai News
Beed News : स्वतःच्याच मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला मरेपर्यंत जन्मठेप; अंबाजोगाई न्यायालयाचा कठोर निर्णय

सूचना आणि हरकतींसाठी आवाहन

या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. यासाठी १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत (दुपारी ३ वाजेपर्यंत) नागरिक आपल्या हरकती व सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात दाखल करू शकतात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Ambajogai News
Ambajogai Protest | लिंगायत समाजाचा अंबाजोगाई नगर परिषद कार्यालयात मृतदेहासह ठिय्या, अंत्यविधीसाठी जागा नसल्याने प्रशासनाचा निषेध

जाहीर करण्यात आलेले १५ प्रभाग

योगेश्वरी

रविवार पेठ

जिरे गल्ली

खडकपुरा

परळी वेस

आदर्श कॉलनी

मंगळवार पेठ

प्रशांत नगर

हौसिंग सोसायटी

गुरुवार पेठ

गवळीपुरा

सदर बझार

एस. आर. टी. दवाखाना

लाल नगर

मोंढा-माऊली नगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news