Beed crime : कुंटणखान्यावर धाड

एका आंटीसह दोन पीडित महिलांची सुटका
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरलगत पोखरी रोडवरील पिताजी नगरी येथील भाड्याने रहात असलेल्या एका फ्लॅटमध्ये एका आंटीच्या मदतीने अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून धाड टाकत आंटीसह दोन महिलांची तेथून महिलांची सहीसलामत सुटका केली आहे.

पोखरी रोड परिसरातील पिताजी सारडा नगरीतील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या फ्लॅटवर सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Crime News
Nanded drug crime : गांजाप्रकरणी गुजरात पोलिसांनी लोहगावातील एकाला घेतले ताब्‍यात

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले. पंचांच्या उपस्थितीत डमी ग्राहक तयार करून त्याच्यामार्फत संबंधित फ्लॅटवर पाठवण्यात आले. व्यवहार निश्चित झाल्यानंतर डमी ग्राहकाने पोलिसांना ठरल्याप्रमाणे इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकत दोन महिलांची सुटका केली.

या प्रकरणी शिवकन्या नवनाथ फड (वय 40) हिच्याविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरून काही साहित्यही जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने केली आहे.

Crime News
Nanded gambling raid : जुगार अड्ड्यावर छापा; ५ जण गजाआड, ३ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news