चारित्र्य स्वच्छ ठेवा, 'मोका' लावायला मागेपुढे पाहणार नाही; अजितदादांचा सज्जड दम

Ajit Pawar | बीड घटनेत तथ्य असेल तिथे कारवाई करणार
Ajit Pawar
Ajit Pawar | चारित्र्य स्वच्छ ठेवा, 'मोका' लावायला मागेपुढे पाहणार नाही; अजितदादांचा सज्जड दम file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ajit Pawar | चारित्र्य आणि जनमानसात प्रतिमा स्वच्छ ठेवा. चुकीचं काम केल्यास मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथे पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्री पदाची सुत्र हातात घेतल्यानंतर आज (दि. ३०) त्यांचा पहिलाच बीड दौरा आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी 'खपवून घेणार नाही' असा दम देतानाच कानपिचक्या दिल्या.

धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवार म्हणाले की, बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. पण ज्या घटनांमध्ये तथ्य असेल तिथे कारवाई करणार. खंडणीची प्रकरणं खपवून घेणार नाही. रिव्हाल्वर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करण्यास सांगणार. चुकीची माणसं आजूबाजूला ठेऊ नका. रिल वगैरेही खपवून घेतली जाणार नाहीत. आपलं आपलं स्वत:च चारित्र्य स्वच्छ ठेवा, असा अप्रत्यक्ष टोला पवार यांनी धनंजय मुंडे यांना लगावला.

मोका लावायला मागे पुढे पाहणार नाही

चुकीचं वागू नका जवळचा असेल तरी कारवाई होणार. कोणी काय केल तर राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. कोणावर अन्याय होऊ देणार नाही. जनतेचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. विकासकामे करत असताना खंडणीचे प्रकार करू नका, नाहीतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. जर कोणी वेडेवाकडे प्रकार केले तर सगळ्यांना नियम सारखे असतील. माझी कामाची पद्धत वेगळी आहे. सर्व कामे दर्जेदार झाली पाहिजेत, असा इशाराही त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news