Beed News : अजित पवार हे या शतकातले जननायक

माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे प्रतिपादन; गेवराईत शोकसभा
beed news
अजित पवार हे या शतकातले जननायकfile photo
Published on
Updated on

Ajit Pawar is a people's leader of this century Former MLA Amarsingh Pandit

गेवराई, पुढारी वृत्तसेवा :

अजितदादा पवार हे सामान्य माणसाचे नशीब बदलणारे नेते होते, सगळे व्यवस्थित होत असताना त्यांचे जाणे आम्हा सर्वांना उध्वस्थ करणारे आहे. अजितदादा शेवटच्या घटकाची नोंद करणारे नेते होते, त्यांचे असे अकाली जाणे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. दादांना कुणीही विसरणार नाही. अजितदादा हे या शतकातले जननायक होते अशा भावना माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भावनिक होऊन व्यक्त केल्या, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दुःखद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्पक्षीय नेते उपस्थित होते.

beed news
Beed Crime News : बनावट नोटा प्रकरणात केजचा माजी सरपंच तामिळनाडूत गजाआड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक दुःखद निधनाच्या निमित्ताने गेवराई येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, भाऊसाहेब नाटकर, उद्धव मडके, श्रीकांत सानप, किशोर कांडेकर, महेश बेदरे, राजेंद्र मोटे, गजानन काळे, सभापती जगन्नाथ काळे, उपसभापती श्रीहरी पवार, दादासाहेब चौधरी, महेश दाभाडे, भाजपचे सचिन दाभाडे, राजेश पवार, राजेंद्र बेदरे, विठ्ठलराव शेळके, शेख खाजा, शितल धोंडरे यांसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण म्हणाले की, अजित दादा कार्यकर्त्यांची काळजी घेणारे नेते होते, विकासकामावर त्यांचे बारीक लक्ष होते. आ. विजयसिंहना त्यांचे सतत मार्गदर्शन होते.

beed news
Beed Crime News | केज हादरले! हनुमंत पिंपरी शिवारात तरुणाची निर्घृण हत्या

कामाचा झपाटा असणारा नेता गेला, त्यांनी केलेला संकल्प आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. दादांची स्वप्नपूर्ती हीच त्यांना आदरांजली असेल असे त्यांनी सांगितले. अमरसिंह पंडित म्हणाले की, नियती कठोर आणि निर्दयी असते. दादांच्या अपघाताने होत्याचे नव्हते झाले, अजितदादा कर्तृत्ववान होते. लोकांच्या मनातील नेते होते. जाती पातीचा विचार त्यांनी केला नाही, असा नेता आपला पालकमंत्री व्हावा हे आपल्या जिल्ह्याचे भाग्य होते. सगळे चालीजुपीला लागले असताना असे घडणे आम्हला उद्धस्त करून गेले आहे.

अजितदादांकडून शिस्त आणि वक्तशीरपणा आम्ही शिकलो. त्यांना श्रद्धांजलीसाठी शोकसभा घ्यावी असे कधीच वाटले नाही. शेवटच्या घटकाची नोंद करणारे अजितदादा होते. सामान्य लोकांसाठी त्यांचे जाणे दुर्दैवी आहे. दादांना कुणीही विसरणारा नाही. दादा हे या शतकातले जननायक होते असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी भाऊसाहेब नाटकर, ऋषिकेश बेदरे, बीड बाजार समितीचे उप सभापती शामराव पडुळे, प्रकाश सुरवसे, परमेश्वर वाघमोडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक अजितदादा नाहीत हे मनाला पटत नाही आ.पंडित आपल्या भावना व्यक्त करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, ही घटना मनाला चटका लावणारी आहे. आज दादा आपल्यात नाहीत हे मनाला पटत नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर हा मोठा आघात आहे. अतिशय कमी कालावधीत त्यांनी जे केले ते विचार करण्याच्या पलीकडे आहे. अनेक विकासकामे दिली. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठे नियोजन त्यांनी केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news