PM KISAN : पीएम किसानसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे
agriculture office PM Kisan News
कडा, पुढारी वृत्तसेवा: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळावा, या अपेक्षेने गुरुव-ारी आष्टी येथील कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. मात्र कागदपत्र पडताळणी व ऑनलाईन प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांना तासन्तास कृषी कार्यालयात थांबावे लागते. परिणामी कार्यालय परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, आमचं सर्व काम ऑनलाईन झालं असतानाही हप्ता थांबवला जातोय. प्रत्येक बेळी नवीन कागद मागितले जातात.
आष्टी येथील कृषी कार्यालयात चौकशी करण्यासाठी शेतकरी येतात. परंतु या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून स्पष्ट उत्तर मिळत नाही. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, सर्व कागद वेळेवर दिले, ऑनलाईन नोंदणी केली, तरी नवीन कागद मागितले जातात. अधिकारी बर्गाकडून ठोस उत्तर मिळत नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळावा, या अपेक्षेने आष्टी येथील कृषी कार्यालयात येतात तिथं आल्यावर समजते साहेब आज आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. दररोज शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असते. मात्र कागदपत्र पडताळ-णीसाठी नेमलेले कर्मचारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस कार्यालयात उपस्थित राहतात.
परिणामी, शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते, आणि अनेकदा निराश होऊन परत जावे लागते. प्रत्येक वेळी सांगितलं जातं की, 'आज पडताळणी कर्मचारी आले नाहीत'. आम्ही एवढ्या लांबून आर्थिक भार सोसून इथे येतो, पण आमचं ऐकून घेणारं कोणी नाही अशी प्रतिक्रिया हिवरा येथील शेतकरी अफसर पठाण यांनी दिली. दरम्यान, या सर्व प्रकाराकडे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
काही शेतकऱ्यांची नोंदणी आधार सिर्डीग बाकी आहे तर काही केवायसी किंवा बैंक लिंकिंगमधील त्रुटीमुळे थांबली आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांना लवकरच हप्ता मिळेल, अशी माहिती कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी सांगितले.

