

Action taken against illegal liquor and gutkha sales.
धारूर, पुढारी वृत्तसेवा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू व गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने 'ऑपरेशन हॅपी न्यू इयर' राबविण्यात आले. या मोहिमेंतर्गत धारूर येथे छापा टाकून दारू व गुटखा असा एकूण ८ लाख ४२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली, केज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटमन सह धारूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे, उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, रमाकांत भुसारीसह पोलिस कर्मचारी यांच्या नेतृत्वाखाली ३१ डिसेंबर रोजी करण्यात आली.
तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन ही ताब्यात देण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकारी यांनी सांगितले. तसेच अवैध दारू व गुटखा विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटमन व पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी दिला.