Student harassment case: आरोपींचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिकला जमा

आरोपीच्या आर्थिक व्यवहाराकडे पोलिसांच्या तपासाची सुई
Beed News
Beed News : आरोपींचा मोबाईल, लॅपटॉप फॉरेन्सिकला जमाFile Photo
Published on
Updated on

Accused's mobile phone, laptop submitted to forensics

बीड, पुढारी वृत्तसेवा: शहरातील लैंगिक छळ प्रकरणात अटकेत असलेला क्लासचा संचालक विजय पवार व शिक्षक प्रशांत खाटोकर यांचा पोलिसांकडून अनेक बाजूंनी कसून तपास सुरू आहे. सध्या दोघेही पोलिस कोठडीत असून, त्यांच्या आर्थिक स्रोतांची, डिजिटल साधनांची व घटनास्थळाशी संबंधित महत्त्वपूर्ण पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे. आरोपींचा मोबाईल, लॅपटॉप, डीव्हीआर फॉरेन्सिकला जमा करण्यात आला आहे.

Beed News
Beed News : परळी शहरातील गजबजलेल्या चौकात अंधश्रद्धेला खतपाणी; हळदीकुंकू टाकून कोंबड्याचा दिला बळी

या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबात, गेल्या वर्षभरात वारंवार छळ झाल्याचे गंभीर आरोप केले आहेत. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असून, पीडितेने घटनास्थळ दाखवून दिल्यानंतर पंचनामाही करण्यात आला आहे. यासोबतच पीडितेने न्यायालयात जबाब दिला आहे. पुरावे व तपासाचा वेध क्लासमध्ये लावलेले ४० सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र त्यातील डीव्हीआरमध्ये फक्त २० दिवसांचाच डेटा आढळून आला आहे.

त्यामुळे संपूर्ण वर्षभरातील माहिती मिळवण्यासाठी डीव्हीआर फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात IDUCATIONAL MISSIONS OPEN आला आहे. दोघांचे मोबाईल फोन, टॅब, लॅपटॉप, तसेच खाटोकरची दुचाकी जप्त करण्यात आली असून, त्यातील डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि इंटरनेटचा वापर या दोन्हीचा तपास पोलिस करत आहेत.

Beed News
Beed Crime News : गायरान जमिनीच्या वादातून कुटुंबावर कुऱ्हाडीने हल्ला

या विद्यार्थिनीने सुरुवातीला हे शोषण कोणालाही सांगितले नव्हते. मात्र मानसिक त्रासामुळे तिच्या वागण्यात बदल झाल्यानंतर कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर समुपदेशनाद्वारे हळूहळू सत्य बाहेर आले. यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढे तपास सुरू झाला. या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणींसह इतर विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कुटुंबीयांचे असे एकूण ३० जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. पोलिसांनी शैक्षणिक संकुलातील इतर व्यवस्थापक व सहकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. दोघांची दोन दिवसांची पोलिस कोठडी शनिवारी संपत असून, त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर पुढील कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

करचुकवेगिरी झाल्याचा पोलिसांना संशय

तपासादरम्यान, क्लास संचालक विजय पवार याने कर टाळण्यासाठी प्रशांत खाटोकरला दुसऱ्या क्लासचा मालक म्हणून दाखवल्याची बाब पुढे आली आहे. क्लासेसमधील विद्यार्थ्यांची हजेरी, शिक्षकांच्या उपस्थितीच्या नोंदी, सुट्यांचे तपशील यांचे कोणतेही व्यवस्थित रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने पवार व खाटोकर यांचा गैख्यवहार व बेमालूम कारभार स्पष्ट होत आहे.

घटनेचे मरिक्रिएशन होणार

पोलिस आता या संपूर्ण घटनाक्रमाचे रिक्रिएशन करण्याच्या तयारीत असून, नेमकी घटना कशी घडली, कोणत्या काळात, कुठे व कोणत्या स्वरूपात कायदाभंग झाला, याचा शोध घेतला जाणार आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणत्या हालचाली कैद झाल्या, त्यांचा वेळ, जागा आणि प्रत्यक्ष कृती यांचा तपास करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news