माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : माजलगाव येथील महावीर अग्रो एजन्सीमध्ये जादा दराने कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार गुरूवारी (दि.३०) रात्री कृषी विभागासह पोलिसांनी छापा टाकत या एजन्सीवर कारवाई केली.
खरीप हंगामामुळे कापूस व इतर पिकांचे बियाणे एमआरपीच्या दराने विक्रीसाठी सर्व कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाले आहे. मात्र माजलगाव येथील जुना मोंढा परिसरात असणाऱ्या महावीर अग्रो एजन्सीमध्ये कापूस बियाण्यांची किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार कृषी विभागाच्या भरारी पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी पिपंरी खुर्द येथील एका शेतकऱ्याला ८०० रुपये किंमतीच्या बियाण्यांची दोन पाकिटे ११०० रुपये किंमतीने विकत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यानुसार या एजन्सीवर कारवाई करण्यात आली.
हेही वाचा :