बीड : चिंचाळ्यात मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले
Beed Crime News
चिंचाळ्यात मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्यावर गुन्हा दाखल File Photo
Published on
Updated on

आष्टी | प्रेम पवळ

चिंचाळा येथील बाबासाहेब देवस्थान येथे मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश दत्तू कांबळे (रा. देसूर ता. आष्टी) याला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार शुनिवारी (दि. 17) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.याबाबत दिलीप बाळू पोकळे (वय 34 वर्षे, व्यवसाय शेती रा. चिंचाळा ता. आष्टी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
टॉवरच्या तारांची चोरी करताना पडून मृत्‍यू, साथीदारांनी मित्राला पुरले दुर्गम डोंगरात

चिंचाळा-देसूर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असून, या भागातील खटकळी परिसरात बाबासाहेब देवस्थान परिसरात डांबरीकरणाचे काम करण्यात येत आहे. आहे. बाबासाहेब देवस्थान मंदिरामध्ये काहीतरी ठोकल्याचा मोठ्याने आवाज येत आहे. असे रस्त्याचे काम करणारे अनिल सतीश पोकळे यांनी फिर्यादीला ता. 16 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फोन करून सांगितले. त्यानुसार फिर्यादी हे आपले सहकार्यांसोबत बाबासाहेब देवस्थान मंदिर खटकळी येथे गेले. तेव्हा त्यांना गणेश दत्तू कांबळे हा विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दानपेटी गजाच्या सहाय्याने फोडत असताना मिळून आला. त्याने मंदिराचे लोखंडी गेटचे कुलूप तोडल्याचे व वामनभाऊ मंदिराचेही कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे दिसून आले. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात गणेश कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीचे प्रकार अनेकदा

दरम्यान, चिंचाळा येथे बाबासाहेब देवस्थानमध्ये महादेव मंदिर असून यामध्ये विठ्ठल-रुख्मिनी मंदीर, श्रीसंत वामनभाऊ, श्रीसंत यादवबाबा यांच्या मूर्तीं आहेत. काही दिवसांपूर्वी भाविकांनी अर्पण केलेल्या घंटा, पितळाच्या समया, अर्पण करण्यात आलेले नवसाचे चांदीचे घोडे असा ऐवजाची चोरी झाली आहे. तसेच एका वेळेस दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांचा उलगडा पोलिस तपासात करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील भाविकांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news