Kej Theft | केज बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण चोरणाऱ्या महिलेला अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमाल जप्त, चोरीच्या गुन्ह्यांची उकल होणार
Kej bus stand theft case
बीड येथील माऊली नगर परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतले. Pudhari
Published on
Updated on

Beed Kej bus stand theft case

केज : लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या मंजुश्री जगदाळे या महिला केज बसस्थानकावर थांबल्या असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सुमारे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लंपास केले होते. ही घटना १९ मार्चरोजी दुपारी घडली होती.

या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित महिला त्यांच्या मागे उभी असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे ती बसमध्ये न चढता तेथून निघून गेल्याचेही आढळले.

Kej bus stand theft case
Kej accident news | केज-कळंब रोडवर उभ्या ट्रकला एसटीची जोरदार धडक; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

या धागेदोऱ्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने तपास सुरू केला. जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे बीड येथील माऊली नगर परिसरातून संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेले मिनी गंठणही जप्त करण्यात आले असून तिला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेली महिला सराईत चोर असल्याचे समोर आले असून तिच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. तिच्या अटकेमुळे आणखी काही चोरीच्या घटनांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news