Beed Crime News : शिंगारवाडीत वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेल्याने सर्वत्र हळहळ
Beed Crime News
Beed Crime News : शिंगारवाडीत वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलेFile Photo
Published on
Updated on

A 20-year-old youth ended his life by hanging himself in Shingarwadi

शिरूर : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवल्‍याची घटना शनिवार दि. ७ जून रोजी सायंकाळी उघडकीस आली. आज (रविवार) दि.८ जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र या तरुणांच्या जीवन संपवण्याच्या पाठीमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Beed Crime News
Beed News : आधुनिक काळातही 'वाघ्या-मुरळी'चे महत्त्व टिकून

या विषयी अधिक माहिती अशी की, शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शिंगारवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा रामेश्वर नारायण कोळेकर (20) हा आई-वडिलांना तीन बहिणीच्या पाठीवर एकुलता एक मुलगा होता. गेल्या दहा-बारा वर्षांपासून रामेश्वरचे वडील नारायण कोळेकर हे प्रदीर्घकाल आजारी असल्याने घर चालवण्याची जबाबदारी आई शांताबाई कोळेकर व रामेश्वरवर येऊन पडली होती.

शनिवार दि.७ जून रोजी रामेश्वर हा तिंतरवणी येथील आठवडी बाजारातून जाऊन आला होता. तर आई एकादशीच्या निमित्ताने दुपारी श्री.क्षेत्र नारायण गडावर वारी निमित्त दर्शनासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई शांताबाई घरी आल्यानंतर घर उघडत नाही म्हणून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेतले व घरावरील पत्रे उचकून काढले असता घरामध्ये मुलगा रामेश्वर याने घरातील आडुला गळफास घेऊन जीवन संपवल्‍याचे निदर्शनास आले.

Beed Crime News
Beed Crime News : तक्रार दिल्याच्या कारणावरून माय-लेकराला बेदम मारहाण

सदरील घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्यावतीने घटनेचा पंचनामा करून रामेश्वर कोळेकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चकलांबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आला होता. रात्री उशीर झाल्यामुळे शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना सकाळपर्यंत ताटकळत बसावे लागले. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शव विच्छेदन झाल्यानंतर रामेश्वर यांच्या मृतदेहावर शिंगारवाडी येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामेश्वर कोळेकर हा शांताबाई नारायण कोळेकर या दांपत्यास तीन मुलीच्या पाठीवर एकुलता एक मुलगा होता. तो आजारी वडिलांची लक्षपूर्वक देखरेख करत होता. स्वभावानेही तोच चांगला आणि समजुतदार असल्याचे गावकरी सांगत आहेत. रामेश्वर यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल गावकऱ्यांनाही मोठा संभ्रम आहे, तर त्याच्या या अकाली निधनाचे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामेश्वरच्या जीवन संपवण्या पाठिमागचे कारण स्पष्ट नसून चकलांबा पोलिसांमध्ये या प्रकरणी अकस्मात मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घनश्याम हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news