

The tradition of Khandoba's Jagran Gondal during the wedding season continues.
विकास उचाले कसबे तडवळे :
सध्या लासराईची मोठी धामधूम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यानंतर खंडोचाच्या जागरण गोंधळाची परंपरा आजही धार्मिक पद्धतीने पाळली जात असल्याने लता झाल्यावर अनेक ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम धडाक्यात सुरू आहेत. त्यामुळे वाच्या-मुरळी कलावंतांना 'अच्छे दिन' आले असल्याचे दिसत आहे.
जून महिन्यात ही अनेक लग तारखा असल्यामुळे लासराईची धाम धूम अजून जोरात चालू असल्याचे चित्रआहे. ल झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम घालण्याची परंपरा सगळीकडेच शक्यतो सगळीकडेच असते. त्यासाठी प्रामीण भागात बाधे-मुरली मंडळीना मानाने निमंत्रित केले जाते. रात्रभर हे वाच्या-मुरळी आपली धार्मिक कला सादर करतात. त्यानंतर पहाटे पहाटे मोठ्या उत्साहात आरती व काही ठिकाणी लंगर तोडण्याचा कार्यक्रम पार पाडून कार्यक्रमांची सांगता होते.
ग्रामीण भागात हा कार्यक्रम पाहण्यासाठी पाहुणे, नातलग, शेज-ारी पाजारी व ग्रामस्थ मोठी गर्दी करतात. रात्रभर चालणाऱ्या वाघ्या-मुरळी, जागरण गोधळातून खंडोबा, म्हाळसा, बानू, जोगवा, भारूड, कथा, विनोदी नाटक आदी ग्रामीण भागाच्या संस्कृतीचे सादरीकरण करून ग्रामस्थांचे धार्मिकतेबरोबरच मनोरंजन करण्यात येते. हे कलाकार आपली कला पाटी, दिमडी, डोलकी यावर नाचकाम करून भाविकांची करमणूक करत आपली पारंपरिक कला सादर करतात.
अशा प्रकारच्या कार्यक्रमातून त्या पथकातील वाघ्या-मुरळीसह इतर सहभागी लोक कलावंताला आर्थिक प्राप्तीचे साधन उपलब्ध होते. तसेच हाताला काम मिळते. सध्याच्या आधुनिक जगात काही पारंपरिक गोष्टींना फाटा दिला जात असलातरी अद्यापही बाघ्या-मुरळी कलावंतांना 'अच्छे दिन' असल्याचे दिसून येते.
जागरण गोंधळ या क्षेत्रात काम करणाऱ्या कुटुंबाच्या अनेक पिद्मधा यामध्ये कला जोपासताना दिसतात. है कलाकार खंडोबा, देवीची गाणी, समाज प्रबोधनपर सादर करून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करतात. गौतांसोबतच मुली वाचवा, मुलगी शिकवा संदेश देतात. तसेच समाज घडविण्याचे कामाही करतात. या क्षेत्रात केवल लम्नसराईत काम मिळते. इतरवेळी सदर कलावंतांबर उपासमारीची वेळ येते. शासनाकडून समाजातील अनेक लोक कलामंतांना कलाकारांना मानधनाच्या माध्यमातून मदतीचा हात देत त्यांच्या कलेचा मान राखला जातो मात्र जागरण गोंधळाचे कलावंत दुर्लक्षितब आहेत. शासनाने या दुर्लक्षित राहिलेल्या वाघ्या-मुरळी लोककला प्रकारातील लोकांकडेही लक्ष द्यायला हवे, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
हे काम बारमाही नसून फक्त लासराईपुरतेच मर्यादित असल्याने इतर वेळी शेतीव्यवसपातील इतर रोजंदारी करून घरप्रपंच भागवावा लागतो शासनाने आम्हाला कलेसाठी लागणारे साहित्य देऊन मानधन सुरू करावे तेव्हाच सदर लोककलेचा प्रकार टिकेल, अन्यथा पारंपरिक लोककला मोडकळीस येईल असे खामसवाडी येथील भाउसाहेब वाघे यांनी सांगितले.