केजमधील सख्खे भाऊ झाले पक्के वैरी !

केजमधील सख्खे भाऊ झाले पक्के वैरी !

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात दोन सख्ख्या भावांमधील भांडण टोकाला गेले आहे. या भांडणात एकाने भावाच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या सोबतच दुसऱ्या भावाने भावाकडे पाझर तलावाच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनीवरून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

वडिलोपार्जित जमिनीच्या विभागणी वरुन दोन भावांमध्ये सतत वाद होत होते. यानंतर दोन्ही भावांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्या आहेत. यामध्ये दि.5 जून रोजी भांडणामध्ये मारहाण केल्या प्रकरणी सहदेव ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन केज पोलीस ठाण्यात राजेंद्र बाबासाहेब ठोंबरे, जितेंद्र बाबासाहेब ठोंबरे, बाबासाहेब किसन ठोंबरे आणि सविता बाबासाहेब ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

यानंतर जमिनीवरुन सहदेव आणि बाबासाहेब यांच्यामध्ये सतत वाद होत होते. सहदेव यांनी बाबासाहेब यांच्याकडे घरी जावून दहा लाख रु. आणि दहा गुंठे जमिनीची मागणी केली. जर तसे केले नाही तर खोटी तक्रार दाखल करून मुलांचे चारित्र्य खराब करण्याची धमकी दिली. यानंतर बाबासाहेब ठोंबरे यांच्या तक्रारी वरून बुधवारी (दि.19) केज पोलीस ठाण्यात सहदेव किसन ठोंबरे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news