बीड : घरगुती वादातून नातवाने केला आजीचा खून | पुढारी

बीड : घरगुती वादातून नातवाने केला आजीचा खून

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : घरगुती वादातून नातवाने आजीचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार माजलगाव तालुक्यात समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.२३) सायंकाळी उघडकीस आली. कौशल्याबाई किसन राऊत (वय ७२) असे खून करण्यात आलेल्या आजीचे नाव आहे. या प्रकरणी नातू राहुल बाळासाहेब राऊत (२९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती की, माजलगाव तालुक्यातील लोणगाव येथील कौशल्याबाई राऊत यांचा नातू राहुल राऊत याच्याशी घरात किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. याचा राग मनात धरुन राहुल याने आजी कौशल्याबाई राऊत यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर कौशल्याबाई यांचा मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. आईचा खून केल्याप्रकरणी मुलाच्या विरोधात बाळासाहेब राऊत यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेतली असून नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button