Dhananjay Munde: 'भाऊबीज'निमित्त पंकजा मुंडे यांनी केले धनंजय मुंडे यांचे औक्षण | पुढारी

Dhananjay Munde: 'भाऊबीज'निमित्त पंकजा मुंडे यांनी केले धनंजय मुंडे यांचे औक्षण

बीड; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भाऊबीज निमित्त भेट दिली. यावेळी पंकजा मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पंकजा मुंडे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी हा सोहळा रंगला. बऱ्याच वर्षानंतर पंकजा मुंडे यांनी भाऊबीज निमित्त औक्षण केल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या ‘X’ पोस्टमधून म्हटले आहे.

गत काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कारणामुळे दुरावा आला होता. परंतु आता अनेकदा हे भाऊ-बहीण एकत्र येताना दिसत आहेत. भाऊबीज निमित्त पुन्हा एकदा ते एकत्र आल्याने याची आता राज्यभरात चर्चा होऊ लागली आहे. बऱ्याच वर्षांनंतर पंकजा ताईसोबत काल भाऊबीज साजरी करून दीपावली व भाऊबीजेच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला. सर्व भाऊ-बहिणीचे नाते अधिकाधिक वृद्धिंगत होत जावे, अशी प्रार्थना यानिमित्ताने केली, असे  धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button