Beed News : केजमध्ये रस्त्यात बंद पडलेल्या कंटेनरमधून २३ बैलांची सुटका

११२ वर फोन येताच पोलिसांची कारवाई; चालक फरार, गुन्हा दाखल
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

केज : केज-अंबाजोगाई मार्गावरील पिसेगाव फाटा परिसरात रस्त्यात बंद पडलेल्या एका कंटेनरमधून २३ बैलांची सुटका करण्यात आली. कंटेनरमध्ये जनावरे कोंबून नेली जात असल्याची माहिती ११२ आपत्कालीन क्रमांकावर मिळताच केज पोलिसांनी तातडीने कारवाई करत कंटेनर ताब्यात घेतला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना रविवारी (दि. २८ जून) मध्यरात्रीनंतर घडली.

एमएच-२०/डीई-३०२९ क्रमांकाचा कंटेनर पिसेगाव फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर बंद पडला होता. कंटेनरमध्ये बैल असल्याचे लक्षात आल्यानंतर एका नागरिकाने ११२ क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

Crime News
Bogus Property Registrations : बोगस रजिस्ट्रीचे 'केंद्र' बनले छत्रपती संभाजीनगर

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, जमादार बजरंग मुंडे, पोलीस नाईक राहुल तरकसे आणि सरकारी वाहनचालक शिंदे यांच्या पथकाने सोमवारी पहाटे सुमारे ३.१० वाजता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून कंटेनर चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ९ लाख ५ हजार रुपये किमतीचे २१ खिल्लार जातीचे व २ जर्सी जातीचे असे एकूण २३ बैल आढळून आले. याशिवाय सुमारे ५ लाख रुपये किमतीचा कंटेनरही जप्त करण्यात आला.

Crime News
कीर्तनाला जाणाऱ्या रिक्षालचालकासह कुटुंबीयांना मारहाण

सर्व बैलांची सुटका करून त्यांना संगोपनासाठी चिंचोली फाटा येथील माऊली गोशाळेत सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी पोलिस नाईक राहुल तरकसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार बजरंग मुंडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news