शरद पवार मुस्लिम समाजाला उमेदवारी देणार का?

माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांचा सवाल
 Sharad Pawar Beed News
शरद पवार File photo
Published on
Updated on

माजलगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्र पवार हे बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला उमेदवारी देणार का? असा सवाल माजलगावचे माजी नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी उपस्थित केला आहे. मंजूर हे माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुक लढण्यासाठी ईच्छुक आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बीड जिल्ह्यात किमान एकतरी विधानसभा मतदारसंघ मुस्लिम उमेदवार साठी सोडण्याची गरज असल्याचे शेख मंजूर यांनी म्हटले आहे. मंजूर यांनी माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुस्लिम समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेला बजरंग सोनवणे यांना विजयी करण्यामध्ये बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा राहीला आहे. बीड व माजलगाव या मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची मतदानाची टक्केवारी मोठी आहे. बीड लोकसभा मतदार मतदार संघात बजरंग सोनवणे थोड्या लीडने निवडून आले असले तरी मुस्लिम समाजाने मोदी विरोधात व शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकजुटिने मतदान केले होते.

माजलगाव मतदार संघातही मुस्लिम समाजाच्या बुथवरिल टक्केवारी पाहिली तर ९० ते ९५ टक्के मतदान हे बजरंग सोनवणे यांना झाले आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी मिळावी ही आग्रही भूमिका समाजातील शिष्टमंडळाने पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news