धारूर; पुढारी वृत्तसेवा : धारूर येथील बसस्थानकाशेजारील आठवडी बाजारात विषारी औषध पिऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना आज (दि.८) दुपारच्या सुमारास घडली. श्रीकृष्ण मोहन चोले (वय २७, रा. आसोला, ता. धारूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आसोला येथील श्रीकृष्ण चोले हा धारूर येथे शुक्रवारी सकाळी आला होता. त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो तडपडत असताना त्याला धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या आत्महत्येप्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील भाऊ, असा परिवार आहे.
हेही वाचलंत का ?