बीड: आरोपीला अटक करण्यासाठी पीडितेचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

बीड: आरोपीला अटक करण्यासाठी पीडितेचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

केज: पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यात एका दलित महिलेवर एका राजकीय व्यक्तीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकऱणी त्या राजकीय व्यक्तीला अटक केलेली नाही. उलट पीडितेवर खोटे गुन्हे दाखल करून तिला धमक्या देण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालयासमोर पीडितेसह तिचे वृद्ध आई-वडील आमरण उपोषणाला बसले आहेत. या प्रकरणी तत्काळ कारवाई न केल्यास सर्व कुटुंबीय आत्मदहन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील एका दलित महिलेवर एका राजकीय व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. यातून ती महिला गरोदर राहिली. तिचा पुणे येथे गर्भपात ही करण्यात आला. त्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात २७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत करत होते.

दरम्यान, या घटनेला दोन महिने उलटून गेले तरी आरोपीवर कारवाई केलेली नाही. आरोपीकडून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे पीडित महिला, वृद्ध आई वडील आमरण उपोषणाला बसले आहेत. आरोपीला तत्काळ अटक करावी. अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news