

धारूर(बीड), पुढारी वृत्तसेवा : धारुर घाटात 10 सप्टेंबर रोजी सकाळी एसटी बस व कारचा अपघात झाला होता. यामध्ये कार मधील जखमी शाहूराव प्रल्हादराव काजवे यांना तात्काळ लातूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि.17) दुपारी निधन झाले. धारूर घाटात असे अजून किती मृत्यू झाल्यानंतर घाटाचा प्रश्न मार्गी लागेल असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
धारूरच्या घाटामध्ये 10 सप्टेंबर रोजी एस टी बस व कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला होता. कारमध्ये चार व्यक्ती होते. त्यापैकी वडवणीचे शाहूराव प्रल्हादराव काजवे (वय 60 वर्ष) व कार चालक यांना गंभीर मार लागून जखमी झाले होते.
स्थानिक नागरिकांनी जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. शाहूराव काजवे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
"राजकारण थांबवा मार्ग काढा"
घाटाचा प्रश्न गंभीर होत चालला असून याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्याने या घाटामध्ये प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तसेच खूप जणांचे घाटात अपघात होऊन जीव गेले आहेत.
हेही वाचा