बीड: एकुरका येथे विहिरीत बुडून बापलेकाचा मृत्यू

बीड: एकुरका येथे विहिरीत बुडून बापलेकाचा मृत्यू
Published on
Updated on

केज : पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील एकुरका येथे विहिरीत बुडून बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. नटराज रामहरी धस (वय ३३) आणि सोनू ऊर्फ रोहन नटराज धस (वय १३) अशी मृत बापलेकाची नावे आहेत.

या बाबतची माहिती अशी की, एकुरका (ता. केज) येथील चौथीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा सोनू सोमवारी शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत शेतात गेला होता. रोहन धस यावेळी माळ नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतातील राजाभाऊ धस यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला. पाय घसरून तो विहिरीत पडून गटांगळ्या खात असल्याचे त्याच्या वडिलांना दिसले. नटराज  यांनी विहिरीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहन याने त्यांच्या गळ्याला मिठी मारल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

विहिरीच्या कडेला आढ‍‍ळले चप्पल, चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुड्या

दरम्यान, विहिरीजवळ अन्य दुसरे कोणी नसल्यामुळे ते दोघे बापलेक विहिरीत पडल्याची कोणालाही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ते दोघेही रात्री घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. शेतात जाऊन पाहिले असता विहिरीच्या कडेला चप्पल, चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला. त्यावरून ते दोघे विहिरीत पडले असल्याचा अंदाज केला. गावकऱ्यांनी विहिरीत बोराटी टाकून आणि गळ टाकून शोध घेतला. परंतु तपास लागला नाही. त्यानंतर पाण्यात कॅमेरा सोडून शोध घेतला. मुरुड येथून एका व्यक्तीला बोलावून त्याच्या मदतीने गळ सोडून दोघांचे मृतदेहवर काढले. यावेळी उपस्थित महिला आणि नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशानुसार नांदूरघाट पोलीस चौकीचे मेसे आणि रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेद नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. बापलेकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

विहिरीतील पाण्यात कॅमेऱ्याने घेतला शोध

विहिरीत पडलेल्या बाप-लेकांचा शोध घेण्यासाठी विहिरीतील पाण्यात कॅमेरा सोडून त्याद्वारे शोध घेतला असता दोघांचे मृतदेह आढळून आले.  विहिरीत सुमारे ३० ते ३५ फूट पाणी होते. तसेच विद्युत पंपाने पाणी उपसा करण्यासाठी विहिरीजवळ लाईट देखील नव्हती. म्हणून मुरुड येथून एका गळ टाकणाऱ्या इसमाला बोलावून गळाच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news