बीड : गेवराई येथून महानुभाव पंथाच्या वतीने ८०० दुचाकींची रॅली

गेवराई येथून महानुभाव पंथाच्या वतीने ८०० दुचाकींची रॅली
गेवराई येथून महानुभाव पंथाच्या वतीने ८०० दुचाकींची रॅली

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : गेवराई तालुक्यातील महानुभाव पंथाच्यावतीने श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी वर्षानिमित्त ८०० ध्वज घेऊन ८०० दुचाकींची रॅली काढण्यात आली. ही महारॅली सत्य, अहिंसा, समता, न्याय, नम्रता हा श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा दिव्य संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करील, असे संयोजक परम महंत श्री कृष्णराज  गुर्जर यांनी यावेळी सांगितले.

महंत कृष्णराज म्हणाले की, धर्मस्थानाचे व समाजाचे अतुट नाते आहे. मनुष्याला मानसिक ऊर्जा व अध्यात्मिक प्रेरणा मिळण्यासाठी धर्मस्थानांची आवश्यकता आहे. धर्मस्थळे ही मनुष्याची आध्यात्मिक ऊर्जेचे स्त्रोत व धर्मस्थानाचे व समाजाचे अतुट नाते आहे. निकोप  मानसिक स्वास्थ्यासाठी व आत्मिक उन्नतीसाठी धर्मस्थळाची समाजाला नेहमीच गरज वाटली आहे. धर्मस्थळे बांधण्याची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे. ती कधी थांबणार नसून ऊर्जा व आध्यात्मिक प्रेरणा मिळण्यासाठी धर्मस्थानांची आवश्यकता आहे. प्राचीन मराठी साहित्य आणि तत्वज्ञान समृद्ध करण्यात महानुभाव पंथीयांनी मोलाची कामगिरी बजावली असून, संस्कृत भाषेच्या जोखडात अडकलेले ज्ञानाचे भांडार मराठीत आणण्याचा पहिला जाणीवपूर्वक प्रयत्न महाराष्ट्रात महानुभाव पंथाने केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या महारॅलीचे आयोजन श्री दत्तात्रेय आत्मतिर्थ प्रतिष्ठान व  गोविंद प्रभु जन्मोत्सव समिती श्री क्षेत्र पांचाळेश्वरच्या वतीने करण्यात आले. गेवराई येथील श्री दत्त मंदिर ते श्री क्षेत्र पांचाळेश्वर या मार्गावर ८०० दुचाकी आणि ८०० ध्वज घेऊन रॅली काढण्यात आली. श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातून उत्तरपंथी गेले. त्यास ८०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ही महारॅली काढण्यात आल्याचे यावेळी सांगितले.

रॅली निघण्यापूर्वी गेवराई येथील श्री दत्त मंदिरासमोर महिला व पुरुषांनी लेझीम व फुगडीचा फेर धरला. त्यानंतर गेवराई येथून पांचाळेश्वर येथे रॅली आल्यानंतर प्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती. तरीही मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होता. भगवान श्रीकृष्णच्या जय जयकाराने परिसर दुमदुमून गेला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news