श्री संत गजानन महाराज पालखीचे मराठवाड्यात आगमन; पानकनेर येथे स्वागत

संत गजानन महाराज
संत गजानन महाराज

हिंगोली; पुढारी ऑनलाईन : आषाढी एकादशीनिमित्त शेकडो लोक पायदळ आणि हातात दिंड्या घेवून विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विदर्भातील शेगाव येथून निघालेली श्री. गजानन महाराज संस्थानची पालखी आज सोमवार (दि.५) रोजी विदर्भातून मराठवाड्यामध्ये दाखल झाली आहे, श्री. गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने पालखी मार्गावर आले आहेत. भाविकाची असंख्य गर्दी या ठिकाणी दिसून आल्याने पालखी मार्गाला यात्रेचे स्वरूप आले आहे.

मराठवाड्यात पालखी दाखल झाल्यानंतर पालखी मार्गावर जागोजागी चहा, पाणी व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय पायदळ दिंडीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात होती. आज सोमवारी पहाटेपासूनच पालखी मार्गावर भाविक दाखल झाले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news