औरंगाबाद : पाडळी येथील धडावेगळे केलेले शीर पोलिसांना अथक प्रयत्नानंतर अखेर सापडले

औरंगाबाद : पाडळी येथील धडावेगळे केलेले शीर पोलिसांना अथक प्रयत्नानंतर अखेर सापडले
Published on
Updated on

पैठण; पुढारी वृत्तसेवा: पैठण तालुक्यातील पाडळी गावातील संदीप संपत गायकवाड याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी ( दि.१९) रात्री कुऱ्हाडीने शीर धडावेगळे करून निर्घृन खून केला होता. घटनास्थळावरून गायब झालेले शीर बिडकीन पोलीस व क्यूआर पथकाला पंधरा तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर सापडले आहे. शनिवारी (दि.२१) सकाळी पाच वाजता पोलिसांना मयत संदीप याचे शीर सापडले. हे शीर बिडकीन येथे शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले असून याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी सपोनि संतोष माने यांनी दिली आहे.

बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाडळी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून गुरुवारी रात्री संदीप संपत गायकवाड ( रा. पाडळी ) याचा आरोपी अजय उर्फ अजिनाथ गायकवाड यांनी कुऱ्हाडीने शीर कापून धडावेगळे केल्याची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळावरून शीर गायब असल्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, गुन्हे शाखेचे रामेश्वर रेंगे, सपोनि संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली क्यूआर पथकाच्या मदतीने बिडकीन पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला शोध मोहीम सुरू केली होती.

याच दरम्यान अखेर पंधरा तासाच्या अथक प्रयत्नानंतर शनिवारी सकाळी पाच वाजता शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. यात उपनिरीक्षक महेश घुगे, जगदीश मोरे, विष्णू गायकवाड, मनेश जाधव, सफौ बोडले, पोना. साळवे, पवार, माळी, कदम, नाडे, वाघमारे, बनगे, धनेधर, मगर, राठोड, ढवळे, धनवे, बल्लाळ, शेजुळ, वसावे यांच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news