छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा : सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच – 22 एन 2888) ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांना (एम एच 16 डीबी 5698) चिरडले. ही घटना आज (दि.6) दुपारी चिखलठाणा परिसरातील बाजार तळाजवळ घडली. या भीषण अपघातात एक तरूण ठार झाला. तर दोन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अक्षय सतीश बडदे (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर या घटनेत सद्दाम जैनी शेख (वय २०) आणि भगवान गोरे (वय २०, सर्व रा. शेवगाव, जि. अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी एम सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा