बीड : केजमध्ये दोन गटात वाद : शहरात तणावपूर्ण शांतता

बीड : केजमध्ये दोन गटात वाद : शहरात तणावपूर्ण  शांतता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन; केज : केज (बीड) शहरातील लोंढे गल्ली परिसरामध्ये गुरुवारी (दि.२३) दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन हाणामारी झाली. त्यामध्ये अफवा पसरल्यामुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करून हल्ला केला. यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

या बाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री ११:३० च्या दरम्यान केज शहरातील लोंढे गल्ली येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले आणि त्यानंतर दगडफेक झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिवर नियंत्रण मिळविले.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार परिस्थितीवर हाताळत आहेत.

पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांच्या फिर्यादीवरून फिर्याद दाखल करून दोन्ही गटातील ७० लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच इतर ५० ते ६० लोकांवर भादवि १४३, १४७, १४८, १४९, १५३(अ), ३२३, ३२४, २९५, ३३६, ३०८, ४२७, १६०, १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news