

बीड ; वृत्तसंस्था : नेकनूर पासून जवळच असलेल्या वैतागवाडी येथे पती हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी मृतावस्थेत बेडवर आढळून आली आहे. सदरची घटना गुरुवार (दि. १६) रोजी दुपारच्या वेळेस घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेकनुर पासून पाच किलोमीटर अंतरावर वैतागवाडी हे गाव आहे. त्या ठिकाणी शेतकरी कुटुंबातील राजेश भालचंद्र जगदाळे (वय २६) व दीपाली राजेश जगदाळे (वय २४) यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास नेकनूर पोलीस ठाण्यात वैतागवाडी येथे सदरील घटना घडल्याचा फोन आला. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव व त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांना घटनेच्या ठिकाणी पती राजेश जगदाळे हा फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर पत्नी दिपाली जगदाळे ही बेडवर मृतावस्थेत आढळली. (suicide)
या प्रकरणाचा नेकनूर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या घटनेतील महिला ही गरोदर होती.