औरंगाबाद : राज्यात दोन तासात 435 कोटींचा भ्रष्टाचार, राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप | पुढारी

औरंगाबाद : राज्यात दोन तासात 435 कोटींचा भ्रष्टाचार, राज ठाकरे यांचा सरकारवर आरोप

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा

राज्यात ओबीसी जनगणनेवरून केंद्र व राज्य सरकार यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. ओबीसी मोजणीसाठी 435 कोटी रुपये लागणार आहेत. आणि हा 2-3 तासाचा भ्रष्टाचार आहे, असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केला.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे मंगळवारी (दि.14 )शहराच्या दौऱ्यावर आले होते, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले, आरक्षण हा फक्त निवडणुकांपुरताच मुद्दा राहिला आहे. राज्यात ओबीसी जनगणनेवरून राजकारण सुरू आहे. फक्त 435 कोटीत ओबीसींची जनगणना होईल, असेही ते म्हणाले. एसटी महामंडळ कर्मचारी संपावर तर बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, ‘एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत ते अंगावर आले तर काय होईल, याचा सरकारने विचार करावा.’

Back to top button