बीड: केज येथे लग्नाच्या आमिषाने विवाहित परिचारिकेवर अत्याचार

बीड: केज येथे लग्नाच्या आमिषाने विवाहित परिचारिकेवर अत्याचार
Published on
Updated on

केज: पुढारी वृत्तसेवा: केज येथील उपजिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन केंद्रातील कंत्राटी कर्मचारी असलेल्या तंत्रज्ञाने एका विवाहित कंत्राटी परिचारिकेवर तिच्या सोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.

परिचारिका विवाहित असून तिला एक मूल आहे.

केज येथे असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाच्या इमारतीत खाजगी तत्त्वावर सिटी स्कॅन केंद्र सुरू आहे. तेथे कंत्राटी तत्त्वावर काम करणारा तंत्रज्ञ राहुल डोंगरे याची त्याच्या सोबत काम करणाऱ्या परिचारिकेची कामाच्या निमित्ताने ओळख झाली. सदर परिचारिका ही विवाहित असून तिला एक मूल देखील आहे. तंत्रज्ञ राहुल यांने परिचारिकेला, तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे. मी तुझ्याशी लग्न करतो. असे म्हणून लग्नाचे आमिष दाखवून धारूर रोडवर असलेल्या त्याच्या रूमवर नेवून वारंवार बलात्कार केला. जर याची वाच्यता केली. तर जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित परिचारिकेने त्याच्या मागे लग्न करण्याचा तगादा लावला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि लग्न करण्यास नकार दिला.

त्यामुळे दि. १८ रोजी पीडित परिचारिका ही त्याच्या धारूर तालुक्यातील घरी गेली असता पीडितेला राहुल डोंगरे, त्याचे वडील व भाऊ या तिघांनी तिला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. राहुल डोंगरे यांच्यासह त्याचे वडील आणि भाऊ या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास प्रभारी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार करीत आहेत.

दोघांनाही कामावरून काढून टाकले

आठ दिवसांपूर्वी राहुल डोंगरे व पीडिता या दोघांना ही कामावर न येण्यासंदर्भात त्यांना कळवले आहे, असे सिटी स्कॅन केंद्राचे ऑपरेशनल मॅनेजर यांनी सांगितले. मात्र, त्यांना आदेश पोहोच झालेला नाही.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news