ओबीसी उपोषणकर्त्यांची दखल घ्या, खा. प्रणिती शिंदेंना निवेदन

ओबीसी उपोषणकर्त्यांची दखल घ्या, खा. प्रणिती शिंदेंना निवेदन

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे मंगळवारी (दि.19) लक्ष्मी दहिवडीमध्ये होत्या. यावेळी लक्ष्मी दहिवडीतील कार्यकर्त्यांनी ओबीसी आंदोलनकर्त्यांची दखल घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

ओबीसी आरक्षणासंदर्भात जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे तर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ॲड. मंगेश सासणे हे १२ जून २०२४ पासून उपोषण करत आहेत.

उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आपण याकडे लक्ष द्यावे. ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवून सगेसोयरे मसुदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. ओबीसी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांचे उपोषण सोडवण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news