जालना: ओबीसी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेलेचं नाही

जालना: ओबीसी उपोषणकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेलेचं नाही

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल (दि.17) वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आंदोलनाला भेट दिली. यावेळी शिष्टमंडळाने उपोषणकर्ते लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण सोडून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीला येण्याचे आग्रह केला. परंतु उपोषणकर्त्यांनी नकार देत सरकारसोबत चर्चा करण्यासाठी पाच जणांचे शिष्टमंडळ पाठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आज (दि.18) उपोषणाच्या सहाव्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी आपण असं कोणतंही शिष्टमंडळ पाठवणार नसल्याचं सांगितल्याने उपोषणकर्त्यांच्या वतीने कोणतही शिष्टमंडळ मुंबईला गेले नाही.

सरकारसोबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाची गरज नसून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधीने येथे येऊन महाराष्ट्राला समजावून सांगावे की, मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसत नाही. तसे लेखी दिले तर आम्ही उपोषण मागे घेऊ. ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, राज्यपालांच्या सहीचं लेखी हमीपत्र देण्याची मागणी ही हाके यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे आहे का? सरकार घटनेशी फ्रॉड करत आहे. कोणती जात पुढारलेली आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. फुले-शाहू पुन्हा जन्माला येणार नाहीत, आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागेल, कायदा तोडून ओबीसींच्या ताटातील घास हिसकावण्याच्या राज्यातील नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे,

'सगेसोयरेची अंमलबजावणी झाल्यास फक्त ओबीसी नाही तर नाही, तर एस सी. एसटी. आरक्षणालाही धोका' असल्याचे ही लक्ष्मण हाकें म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत. ते देश पातळीवरचे नेते, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोन तरी करायला हवा, पाहिजे होता.मनोज जरांगेंना माहिती आहे का? धनगर समाज ओबीसीमध्ये येतो म्हणून, आमचे धनगर नेत्यांचे ओबीसीचे आरक्षण टिकले पाहिजे.

छगन भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न करुन ओबीसी म्हणून आम्ही महाराष्ट्रात एक नाहीत म्हणून यांचं फावल आहे. आमचं ओबीसीचा संघटन जर असत तर आमच्या आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा नसता असे ही यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले.

डॉक्टरांचा सलाईन घेण्याचा सल्ला, हाकेंचा नकार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली फाट्यावर राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह नवनाथ वाघमारे गेल्या ६ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणकर्त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे त्यांना सलाईन लावण्याचा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सकांसह डॉक्टरांच्या पथकाने दिला. मात्र सलाईन लावण्यास हाके यांनी नकार दिल्याची माहिती डॉ.राजेंद्र पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news