परभणी : तळतूंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

परभणी : तळतूंबा येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

सेलू, पुढारी वृत्तसेवा : अंगावर वीज पडून एका ६८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान तालुक्यातील तळतुंबा येथे घडली. सदरील प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. माणिकराव गणपतराव घुले वय ६८ वर्ष, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सेलू तालुक्यातील तळतुंबा येथे शुक्रवारी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यावेळी माणिकराव घुले हे शेतातील बोरीच्या झाडाखाली बसले होते. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती परसराम दत्तराव घुले यांनी पोलिसांनी दिली. घटनास्थळी भेट देत पंचनामा करण्यात आला. शनिवारी दुपारी तळतुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातू असा परिवार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली  वशिष्ठ भिसे करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news