परभणी: माटेगाव येथे शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले

परभणी: माटेगाव येथे शेती कर्जाला कंटाळून तरुणाने जीवन संपविले
Published on
Updated on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्याच्या माटेगाव येथील एका २७ वर्षीय युवकाने शेती कर्जाला कंटाळून वैफल्यग्रस्त अवस्थेत शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून जीवन संपविले. ही घटना गुरूवारी (दि.१३) घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील युवा शेतकरी अमोल देविदास बोबडे (वय २७) याने शेती पिकांवर कर्ज घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे? या विंवचनेतून वैफल्यग्रस्त होत माटेगाव शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news