बीड : पक्षाच्या बॅनरवर जरांगेंचा फोटो; चर्चेला उधाण

बीड : पक्षाच्या बॅनरवर जरांगेंचा फोटो; चर्चेला उधाण

बीड, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांचा आणि त्यांच्या मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत फायदा झाल्याची चर्चा असतानाच, आता बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर मनोज जरांगे पाटलांचा फोटो झळकला. विशेष म्हणजे या बॅनरवर मनोज जरांगे यांचा मोठा फोटो असून त्या बाजूलाच किंगमेकर म्हणून उल्लेख देखील करण्यात आला आहे.

बजरंग सोनवणे यांच्यासह या बॅनरवर आमदार संदीप क्षीरसागर यांचा देखील फोटो आहे. महत्त्वाचं म्हणजे हे बॅनर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष झुंजार धांडे यांनी लावला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा फ्लेक्स लावल्याने, आता या बॅनरमुळे बीडसह जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news